उरण तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न

उरण : राष्ट्रवादी महिला काँग्रेस उरण तालुका तर्फे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी हॉटेल कोर्टनाका उरण येथे मंगळागौर स्पर्धा 2022 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेसाठी महिला सक्षमीकरण, पर्यावरण विषयक जागरूकता, व्यसन मुक्ती, आरोग्यविषयक जागरुकता आदि विषय ठेवण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित मंगळागौरी स्पर्धेत प्रथम क्रमांक जिजाऊ ग्रुप, द्वितीय क्रमांक उरण ब्राह्मण महिला शाखा, तृतीय क्रमांक एकविरा महिला नाच मंडळ मोठी जुई, चतुर्थ क्रमांक जोगेश्वरी महिला नाच मंडळ जासई तर उत्तेजनार्थ दोन बक्षीसे देण्यात आली. कुलदैवत महिलां नाच मंडळ मोठी जुई, मी मराठी महिला नाच मंडळ मोठी जुई यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

सदर स्पर्धेत प्रथम येणाऱ्या ग्रुपला बक्षीस म्हणून दहा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपये, चतुर्थ तीन हजार रुपये व सहभागी प्रत्येक संघांना (ग्रुपला) दोन हजार रुपये देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, सरचिटणीस कुंदा ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष हेमांगी पाटील, शहराध्यक्ष संध्या घरत, उपाध्यक्ष- कलावती भोईर, रेश्मा म्हात्रे, किंजल भोईर, अनिता मळेकर, स्वाती नलावडे.सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गणेश नलावडे, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत अवैध धंद्यांना पोलीस अधिकाऱ्यांचे अभय