विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सौजन्याने पिरकोन येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

शेकाप व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था संयुक्त विद्यमाने पिरकोन, उरण येथे आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी पार

पनवेल : शेतकरी कामगार पक्ष व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ग्राम पंचायत, पिरकोन यांच्या वतीने पिरकोन, उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये सांधेदुःखी, दातांची तपासणी आणि डोळे तपासणी करण्यात आले. सांधेदुखी च्या रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आले तसेच डोळ्यांची तपासणी करून ज्या रुग्णांमध्ये मोतिबिंदूचे लक्षणे आढळले अशा रुग्णांवर मंगळवार दि.२३/०८/२०२२ रोजी नवीन पनवेल येथील नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले. हा आरोग्य शिबिरात समृद्धी क्लीनिक, समृद्धी डेंटल केअर, नायर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल, नवदृष्टी सेवा संस्था, ट्रू डायग्नो यांनी नागरिकांना मोफत सेवा देऊन शिबीर यशस्वी पार पाडले.

      या शिबिराचे उदघाटन मा.जि. प सदस्य जीवन गावंड, सरपंच रमाकांत जोशी, डॉ.मंदार शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी पिरकोन ग्रापंचायतीचे मा.सरपंच हरेंद्र गावंड, चेअरमन अनंता गावंड, शिक्षक जगदीश गावंड, आदर्श शिक्षक विलास गावंड,सदस्य सुरेंद्र गावंड, सदस्य सुधीर गावंड व अन्य मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

या शिबिरासाठी सांधे आणि हाडांच्या रोगाचे तज्ञ डॉ.मंदार शहा, दंतरोग तज्ञ डॉ.भाग्यश्री शहा, नायर आय केयर रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.संतोष कुमार नायर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनस्वी भिंगार्डे आणि टीम, ट्रू डायग्नोचे श्री.परेश पाटील, सुशांत पाटील, सौ.प्रिया पाटील, अक्षय कोळी, विक्रांत ठोकले यांनी मोफत सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जगदीश गावंड, रोहन गावंड, मनिराम गावंड, भाई पाटील, प्रमोद गावंड, आनंद जोशी, संतोष मोकल, माधव गावंड, निलेश गावंड यांनी विशेष सहकार्य केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंगळागौर स्पर्धा उत्साहात संपन्न