खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक संपन्न
खारघर: गणेश उत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये उत्सव साजरा करताना आस्थापनाकडून योग्य त्या परवानगी घेऊनच कार्यक्रमाचे आयोजन करावे अश्या प्रकारच्या सूचना खारघरमधील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, महिला पोलीस निरीक्षक विमल बिडवे उपस्थित होते.
गणेश उत्सव पुढील आठवड्यापासून सुरु होणार असल्यामुळे गणेश मंडळ उत्सव साजरा करण्यासाठी विविध परवानगी मिळविण्यासाठी पत्र व्यवहार करताना दिसत आहे. दरम्यान खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना उत्सव साजरा करताना शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावेत. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे , फलक व चित्रफिती करू नये, उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये , सर्व प्रकारच्या आस्थापनाकडून योग्य त्या परवानगी घेऊनच उत्सव साजरे करावे. गणेश उत्सव मंडपाच्या आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे व स्वयंसेवक नेमावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी. श्री गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूक विहित वेळेत सुरू विहित वेळेत संपवावेत आणि कोणताही अनुचित प्रकार अथवा बेवारस वस्तू व व्यक्तीचा संशयित हालचाली निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. असे सांगून मिरवणुकी दरम्यान डीजे व डॉल्बी याचा वापर करू नये तसेच मद्य प्राशन व बेकायदेशीर कृत्य निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अश्या प्रकारच्या सूचना केल्या. यावेळी बैठकीस शांतता कमिटी आणि सागर रक्षक दल सदस्य आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.