सानपाडा येथे १८९ नागरिकांची नेत्रचिकित्सा
नवी मुंबई ः माजी नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांच्या वतीने सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांची लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गायत्री चेतना केंद्र यांच्या सहकार्याने २१ ऑगस्ट २०२२ रोजी सानपाडा, सेवटर-५ मधील गायत्री चेतना केंद्र येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराचा १८९ रहिवाशांनी लाभ घेतला.
सदर शिबीराप्रसंगी गायत्री चेतना केंद्राचे मन्नुभाई पटेल, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, आयोजिका सौ. कोमल वास्कर यांची विशेष उपस्थिती राहिली. शिबीरात तपासणी केलेल्या १८९ नागरिकांपैकी २३ रुग्णांना मोतिबिंदू असल्याचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांची अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच ७४ शिबीरार्थींना अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले.
नेत्र चिकित्सा शिबीर यशस्वी करण्याकरिता शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर, महिला विभाग संघटक सौ. कविता ठाकूर, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे, महिला शाखासंघटक सौ. सुप्रिया सावंत, युवा सेनाचे प्रल्हाद गायकवाड, जयेश दळवी, संजय पानसरे, गायत्री चेतना केंद्राचे घनश्याम, यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, सदर शिबीरासाठी सहकार्य केलेल्या सर्व शिबीरार्थी, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे गायत्री चेतना केंद्र आणि सौ. कोमल वास्कर यांनी आभार मानले आहेत.