‘श्री गोवर्धनी माता मंदिर'चा जिर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

नवी मुंबई ः कृष्णाष्टमी निमित्त किल्ले गांवठाण बेलापूर येथील ‘श्री गोवर्धनी माता मंदिर'चा १५वा जिर्णोध्दार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ‘श्री गोवर्धनी माता'ची आराधना ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे आणि सौ. स्वाती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्ोतला. दरम्यान, सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होऊन त्यांना सुख, शांती आणि समृध्द जीवन लाभो, अशी प्रार्थना श्री गोवर्धनी मातेला केली असल्याचे ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.


नवी मुंबईतील सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून श्री गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिध्द आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी-कोळ्यांची कुलदेवता असलेली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री गोवर्धनी आईची जनमानसात ख्याती आहे. ‘श्री गोवर्धनी माता मंदिर' निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र लाभलेला असून या पुरातन मंदिराचा जीणोध्दार १५ वर्षांपूर्वी उद्योजक विजय म्हात्रे आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते गोकुळाष्टमीच्या दिवशी करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी यथोचित पुजा-अर्चा करुन येथे उत्सव साजरा केला जातो. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अभिनंदन क्रीडा मंडळ ठरले सोन्याचे हंडीचे मानकरी