श्री मूर्ती विसर्जनासाठी १३४  कृत्रिम तलाव असणार सज्ज

नवी मुंबई-: मागील वर्षी आलेल्या कोरोनामुळे नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत व पाण्यातील प्रदूषण कमी करण्याहेतू नवी मुंबई महानगर पालिकेने कृत्रिम तलावांवर भर देण्यात आला होता. यंदा ही मनपाने कृत्रिम तलावांवर भर दिला असून  १३४ कृत्रिम तलाव श्री  विसर्जनासाठी मनपा तयार ठेवणार असून त्या व्यतिरिक्त २३  नैसर्गिक तलावांवर विसर्जन व्यवस्था असणार आहे 

राज्यात गणेशोत्सव सण हा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात साजरा केला जातो .आणि नवी मुंबई शहर देखील त्यास अपवाद नाही. त्यामुळे या यादरम्यान श्री मूर्ती विसर्जनाकरिता दरवर्षी नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे २३ विसर्जन घाटांवर  चोख व्यवस्था केली जाते. मात्र २०२०मध्ये  कोरोनाची महामारी आल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सलग दोन वर्ष गणेशोत्सव सण साजरा करण्यासाठी शासनाने नियम घालून दिले होते. त्यामुळे विसर्जन घाटावर गर्दी होऊन कोरोना संसर्ग अधिक होऊ नये तसेच पाण्यातील प्रदूषण वाढू नये म्हणून नवी मुंबई महानगर पालिकेने २०२० मध्ये प्रथमतः कृत्रिम  तलाव बनवले. २०२० मध्ये १३५ कृत्रिम तलाव तर २०२१ मध्ये १५५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते आणि याला चांगला प्रतिसाद लाभला होता. यंदा सण साजरे करताना शासनाने सर्व निर्बंध शिथिल केले आहेत.मात्र मागील दोन वर्षात कृत्रिम तलावांचा प्रतिसाद पाहता यंदा देखील शहरात कृत्रिम तलाव बनवण्यावर मनपाने भर दिला असून एकूण १३४ कृत्रिम तलाव विसर्जनासाठी सज्ज असणार आहेत. त्या व्यतिरिक्त २३  नैसर्गिक तलावांवर विसर्जन व्यवस्था असणार आहे  अशी माहिती मनपा शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

राज्यात गणेशोत्सव सण हा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात साजरा केला जातो.त्यासाठी दरवर्षी नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे २३ वीसर्जन घाटांवर तसेच कृत्रिम तलावांवर विसर्जनाची चोख व्यवस्था केली जाते .मात्र श्री मूर्ती विसर्जन वेळी गणेश घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि अशा गर्दीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मनपाच्या वतीने विसर्जन स्थळी सी सी टिव्हीची  करडी नजर असणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत सर्रास गुटखा विक्री