कोव्हीड प्रिकॉशन डोस घेणाऱ्या लकी ड्रॉ विजेत्यांचा सन्मान

नवी मुंबईत १,६६,४५४ नागरिकांनी घेतला प्रिकॉशन डोस

नवी मुंबई ः १५ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १८ वर्षावरील नागरिकांना दुसरी लसघेतल्यापासून ६ महिने किंवा २६ आठवड्यानंतर प्रिकॉशन डोस देण्यास कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत सुरुवात झाली आहे. या महोत्सवामध्ये १५ जुलै पासून १५ऑगस्ट पर्यंत ५२,९०२ नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात आलेला आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १३,८५,०६७ नागरिकांनी कोव्हीडचा पहिला डोस तसेच १२,४२,६९९ नागरिकांनी
कोव्हीडचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे १,६६,४५४ नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.


प्रिकॉशन डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सवात २३ जुलै पासून ७ डी-मार्ट तसेच नेक्सेस सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉल आणि इनॉर्बिट मॉल अशा खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर जातात अशा ९ ठिकाणी विशेष लसीकरण केंद्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. सदर ठिकाणी १४ ऑगस्ट पर्यंत प्रिकॉशन डोस घेणाऱ्या नागरिकांना कूपन देण्यात आले होते. या कूपनचा लकी ड्रॉ प्रत्येक विशेष लसीकरण केंद्रांठिकाणी उपस्थित लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आला. सदर लकी ड्रॉ मधील प्रत्येक केंद्रावरील ३ विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी त्या त्या ठिकाणी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.


दरम्यान, कोव्हीड लसीकरणामुळे कोव्हीडची लागण झाली तरी त्याची तीव्रता कमी असते, असे निदर्शेनास आले. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लस संरक्षित व्हावेत यावर भर दिला आहे. त्यामुळेच कोव्हीड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस पूर्ण करणारे नवी मुंबई राज्यातील अग्रेसर शहर ठरले आहे. १६ ऑगस्टपासून सातही डी-मार्ट मधील लसीकरण बंद करण्यात आले असून केवळ शनिवार आणि रविवार अशा मॉलमध्ये वर्दळ असणाऱ्या दोन दिवशी दुपारी ३ ते ९ या वेळेत सीवुडस्‌ ग्रँड सेंट्रल मॉल आणि इनऑर्बिट मॉल या दोन ठिकाणी लसीकरण सुरु असणार आहे.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री गणेश विसर्जनाच्या वेळी योग्य त्या उपाययोजना करा - प्रितम म्हात्रे