नवी मुंबई संभाजी ब्रिगेड तर्फे जनता दरबार 

नवी मुंबई:आजही अनेक प्रशासकीय समस्या नागरिकांच्या समोर उभ्या राहत आहेत.प्रशासना दरबारी जाऊनही समस्या सुटत नाहीत.त्यामुळे हजारो तक्रारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या.त्या तक्रारींचा निपटारा व्हावा म्हणून  संभाजी ब्रिगेड नवी मुंबई च्या वतीने जनता दरबाराचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.यावेळी तळागाळातील दोनशे नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शविली असल्याची माहिती आयोजक संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबई उपाध्यक्ष दीपक पहूरकर यांनी दिली.

नवी मुंबईतील अनेक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेले आहे. सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य या विषयाच्या अनेक समस्या नागरिकांना त्रस्त करीत होत्या या साठी संभाजी ब्रिगेड नवी मुंबईचे संपर्क प्रमुख अमित पद्माकर यांच्याकडे अनेक तक्रारी येत होत्या.त्यांनी जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष सावंत व उपाध्यक्ष दीपक पहुरकर  यांच्या लक्षात या बाबी आणून दिल्या .नवी मुंबई टीम ने यावर सविस्तर चर्चा करून जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एकेकाला भेटून त्यासाठी अधिक वेळ खर्च होणार इतके लक्षात घेवून सर्वांना एकाच दिवशी वेळ देवून जनता दरबार च्या माध्यमातून त्या सोडविण्याचा निश्चय केला.या वेळी नवी मुंबई च्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

काही समस्या या कायदेशीर मार्गाने सोडविणे गरजेचे असल्याने कायदेविषयक सल्लागार सुद्धा या दरबारात बोलाविण्यात आले होते.जनता दरबार यशस्वी रित्या पार पाडण्यात संघटनेचे पदाधिकारी विकी पवार तसेच मंगेश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नारळी पौर्णिमा निमित्त आगरी कोळ्यांच्या उत्साहाला उधाण