रिक्षा चालक राज्याचे मुख्यमंत्री आहे, रिक्षा चालकांच्या मुलांनी स्वतः ला कमी लेखू नये -प्रवीण पाटील

खारघर :  रिक्षा चालक आपल्या राज्याचा मुख्यमंत्री असल्याने स्वतःला कमी न लेखता आपण रिक्षा चालकांची मुले आहोत हे अभिमानाने सांगा असा उपदेश माजी स्थायी समिती सभापती  प्रवीण पाटील यांनी रिक्षा चालकांच्या मुलांना दिला. या वेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक  नरेश ठाकूर, नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आगरी कोळी रिक्षा महासंघाचे प्रसन्न कडू, राजेश पाटील, कोंकण विभाग रिक्षा महासंघाचे प्रणव पेणकर, राजु राऊत आणि  एकता रिक्षा संघटनेचे कमलाकर ठाकूर, किसन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

   खारघर  शहर  एकता रिक्षा संघटनेच्या रिक्षा चालकांच्या दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार  एकता रिक्षा संघटनेच्या वतीने ता.7 रोजी कोपरा समाज मंदिर मध्ये पार पडला यावेळी पाटील यांनी वरील उपदेश केले. आज जागतिकी करणामुळे विविध प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे चांगले शिक्षण घेवून  तुम्ही जेव्हा मोठया हुद्यावर काम कराल तेव्हा तुमच्या पालकांची नावे समाजात घेतली जातील असा सल्लाही पाटील यांनी दिला . यावेळी नरेश ठाकुर यांनी भविष्यात प्रशासकीय सेवेत उच्च पदावर बसण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यकमात  50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थ्याना मानधन, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे  श्रीनिवास पाटील, विकास सूर्यवंशी, एकनाथ पिंगळे, उत्तम तांबडे, मेघनाथ म्हात्रे, गुरुनाथ पाटील, जयेंद्र कोळी, प्रवीण म्हात्रे, नितीन भगत आदींसह  एकता रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाड्यात १५ हजार घरांवर फडकणार तिरंगा