सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
नवी मुंबईला पावसाने झोडपले
नवी मुंबई-: नवी मुंबई शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जागोजागी पाणी साचले होते.भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहने बंद पडत असल्याने वाहनधरकांचे अतोनात हाल झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
नवी मुंबई शहराला पावसाने बुधवारी अक्षरशः झोडपून काढले.सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरातील जवळपास सर्वच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहंने धीम्या गतीने धावत होती. शिरवणे गावातील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी चार चाकी तीन चाकी वाहन बंद असल्याने वाहनधारकांना ढकलून ही वाहने पाण्याच्या बाहेर काढण्याची कसरत करावी लागली.रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने वाहने अत्यंत धीम्या गतीने धावत होती.सकाळी सव्वा सात वाजता पावसाला सुरुवात झाल्यावर पावसाची संततधार उशिरा पर्यंत सुरु राहून जनजीवन विस्कळीत झाले होते.
----------------------------------------------
मुंबई आणि नवी मुंबई शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा आवारात ग्राहक फिरकला नसल्याने फक्त २५% मालाला उठाव भेटला असून ७५%माल शिल्लक राहिला तर जोरदार पावसामुते मोठ्या प्रमाणात कांदा बटाटा भिजून गेला आहे. बुधवारी कांदा बटाटा आवारात १२४ गाड्या आवक झाली होती.अशी माहिती कांदा बटाटा व्यापारी दिगंबर राऊत यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारात रात्री पासुनच ग्राहक येण्यास सुरूवात होते तर पावसाने सकाळी सात नंतर जोर धरला होता. त्यामुळे पावसाने जोर धरण्या आधीच ग्राहक खरेदी करून गेल्याने भाजीपाल्याला ८५% उठाव मिळाला व १५ %माल शिल्लक राहिला. बुधवारी ४५० भाजीपाला गाड्यांची आवक झाली होती.अशी माहिती भाजीपाला मार्केट चे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.