सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
विमानतळाच्या नावासाठी आज २०० किलोमीटरची मानवी साखळी
वाशी, नवी मुंबई-:नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावे या मागणीसाठी आज (१० जून रोजी) ठाणे रायगड ,पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी २०० कीलोमिटर ची मानवी साखळी तयार करून आंदोलन केले जाणार असून तालुका स्तरावर टप्प्या टप्प्यात ही मानवी साखळी कोविड नियम पाळून मानवी साखळी असणार आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आता जिल्ह्या-जिल्ह्यांत पसरत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक, प्रकल्पग्रस्त आणि शेतकर्यांच्या संघटना एकत्र आल्याने हा लढा आता व्यापक प्रमाणात होत आहे.त्याधर्तीवर
आज( १० जूनला) समस्त भूमीपुत्रांद्वारे नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पालघर ,कल्याण, मुंबई, मुरबाड,डोंबिवली,अंबरनाथ, अलिबाग,पेण, श्रीवर्धन,भिवंडी तसेच ज्या ज्या ठिकाणी आगरी कोळी, कराडी समाज राहत आहे.त्या त्या ठिकाणी मानवी साखळी तयार करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.सर्व ठिकाणी मिळून एकूण २०० किलोमीटर मानवी साखळी असणार आहे.यातील नवी मुंबईतील ठाणे बेलालूर मार्गवरील २१ कीलोमीटरचा टप्पा सर्वात लांब मानवी साखळीचा टप्पा असणार आहे.