स्काडा प्रणाली संपूर्ण शहरासाठी ; त्याचे नियंत्रण कक्ष हे महापालिका मुख्यालयात
स्काडा प्रणाली आता संपूर्ण शहरासाठी उपलब्ध
नवी मुंबई -: नवी मुंबई शहरात पाणी पुरवठयाचे योग्य नियोजन करण्यासाठी वाढती पाण्याची गळती थोपवीण्यासाठी स्काडा प्रणाली सुरू करण्यात आली होती. आणि स्काडा प्रणाली आतापर्यंत मोरबे धरण, भोकरपाडा केंद्र ते बेलापूर सीबीडी उपकेंद्रापर्यंत स्काडा प्रणाली सुरू आहे. मात्र पुढील कालावधीत ही प्रणाली संपूर्ण शहरासाठी सुरू करण्यात येणार असून त्याचे नियंत्रण कक्ष हे महापालिका मुख्यालयात असणार आहे अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जलसंपन्न महापालिका अशी ओळख आहे.त्यामुळे शहराला मुबलक पाणी पुरवठा होत आहे.मात्र असे असले तरी आज शहरात मोठ्या प्रमाणात अनियमित पाणी पुरवठा व पाण्याची गळती तसेच.चोरी होत होती.त्यामुळे पाण्याची गळती व चोरी थांबविण्यासाठी सन २०१० मध्ये जलदगती माहिती व नियंत्रण प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र मोरबे भोकरपाडा केंद्र ते बेलापूर उपकेंद्रापर्यँत ही प्रणाली सुरू आहे. यादरम्यान किती पाणीपुरवठा होतो,कुठे गळती आहे का याबाबतच माहिती उपलब्ध होत आहे. सध्या बेलापूर येथून सर्व शहरातील विभागात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या दरम्यान पुढील भागातील पाणी पुरवठ्याची अचूक माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेलापूर पासून पुढे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची महिती होण्यासाठी संपूर्ण शहरासाठी स्काडा प्रणाली उपलब्ध केली जाणार आहे. आणि त्याचे नियंत्रण कक्ष हे महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात येणार आहे .त्याच बरोबर सध्याचे स्काडा प्रणाली नियंत्रण कक्ष हे आग्रोळी उड्डाणपुलाखाली हलविण्यात येत असून नवीन प्रणाली सुरू होताच दोन्ही नियंत्रण हे महापालिका मुख्यालयातून होणार आहे, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली आहे.