एपीएमसी बाजार आवारातील नालेसफाईचा दावा फोल

नवी मुंबई-:वाशीतील कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या कांदा बटाटा,मसाला आणि दाना बाजार  आवारात नालेसफाई योग्य रीतीने न केल्याने  बाजार आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पाण्याच्या उपसा करण्यासाठी पंप लावावा लागत आहे..त्यामुळे प्रशासनाने केलेला नाले सफाईचा दावा पुरता फोल ठरल्याचे दिसून येत असून  एपीएमसी मधील गटारसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडुन होत आहे.

नवी मुंबईत जोरदार पावासाने शहरात पाणी भरले असून त्यातून एपीएमसी बाजार समितीचे देखील वाचली नसून कांदा बटाटा,मसाला आणि दाना बाजार आवरात मोठया प्रमाणात पाणी भरत आहे.एपीएमसी  प्रशासनाद्वारे बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामा साठी  ठेका दिला जातो त्यात चार महिने नाल्याची देखभाल देखील समावेश आहे. मात्र ठेकेदारा मार्फत  एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व  नालेसफाई करताना फक्त झाकणे काढून गाळ काढण्याचे सोपस्कार पार पाडले जाते.त्यामुळे गटाराच्या आतील गाळ योग्यरीत्या साफ   न केल्याने बाजार आवरात पहिल्याच पावसात पाणी भरून  नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे.तर या पाण्याचा उपसा करण्यासाठी बाजार आवारात आता पंप लावण्याची नामुष्की एपीएमसी प्रशासनावर आली आहे.तर एपीएमसी प्रशासना द्वारे नालेसफाई ही केवळ कागदावरच केली जात असल्याने अशी वेळ दर वर्षी येत असल्याचे कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्काडा प्रणाली संपूर्ण शहरासाठी ; त्याचे नियंत्रण कक्ष हे महापालिका मुख्यालयात