नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
नवी मुंबई -: पावसाळी काळात रत्यातवर खड्डे दिसल्यास सबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यवर कारवाई करण्यात येईल असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते. मात्र नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे प्रथेप्रमाणे मनपा आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र या पडलेल्या खड्ड्यांवरून तरी दिसत आहे.
पावसाळी कालावधीत रस्ते सुस्थितीत असणे हे सर्वात महत्वाचे असून रस्त्यांवर एकही खड्डा असता कामा नये याकरिता आत्तापासूनच सतर्क राहून आपापल्या विभागातील मोठ्या व लहान अशा सर्व रस्त्यांची काटेकोर पाहणी करावी व त्वरीत रस्ते दुरुस्ती करावी. तसेच कोणत्याही परिस्थितीत पावसाळी कालावधीत खड्ड्यांमुळे लोकांची गैरसोय होता कामा नये व खड्ड्याची तक्रार येता कामा नये याची दक्षता घ्यावी .आणि याविषयी निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत मनपा आयुक्तांनी दिले आहेत.असे असले तरी याच्या उलट चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहरात तीन दिवस पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाशी ब्लू डायमंड चौक, अग्निशमन केंद्र समोर, ठाणे बेलापूर मार्ग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यातून वाहन. चालकांना मोठीं कसरत करावी लागत आहे.त्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र या पडलेल्या खड्ड्यांवरून तूर्तास तरी दिसत आहे.