स्काडा नियंत्रण कक्षाच्या भिंतीला तडे ; सदर कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

आग्रोळी गाव जलकुंभ वरील स्काडा नियंत्रण कक्षाच्या स्लॅब आणि भिंतीला तडे

नवी मुंबई : पारसिक हील टेकडीच्या पायथ्याशी आग्रोळी गाव जलकुंभ वरील स्काडा नियंत्रण कक्षाच्या स्लॅब आणि भिंतीला तडे गेल्याने खबरदारी म्हणून मनपाच्या वतीने सदर स्लॅब आणि भिंत पाडण्यात आली. मात्र सदर काम हे आधीच चुकीच्या पद्धतीने केले असल्याचा आरोप करत सदर कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून पाणी पुरवठा होतो.आणि हा पाणी पुरवठा सुरळीत होत आहे की नाही तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी मनपाच्या वतीने,आग्रोली गाव पारसिक हिल लगत असलेल्या जलकुंभ शेजारी स्काडा नियंत्रण कक्ष उभारले होते.सदर कक्षाच्या स्लॅब आणि जलकुंभाच्या भिंतीला मंगळवर दिनांक ६ जुलै रोजी तडे गेल्याचे निष्पन्न झाले.आणि महानगर पालिकेच्या वतीने पुढील संभाव्य धोका पाहता सदर भिंत आणि स्लॅब  पाडण्यात आले.मात्र सदर घटने मागे नैसर्गिक कारण जरी मानले तरी ही वास्तू बांधताना सन २००६-२००७ या वार्षिक कालखंडात त्या वेळेस या ठिकाणी मोठया प्रमाणात खोदकाम तसेच सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम चालू होते, त्यावेळेस सामजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी या कामा बाबत आवाज उठवून हे काम चूकीच्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी महापालिकेस वारंवार केल्या होत्या .तसेच काम सुरू असताना डोंगाराची वरची बाजू देखील खचून जलकुंभासाठी बांधण्यात येणाऱ्या भिंतीवर आदळली होती त्यामुळे बांधलेली भिंत कोलमडून पडली होती.

 मात्र वारंवार तक्रारीनंतर ही ठेकेदारावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती आणि त्याचाच परिपाक म्हणून नियंत्रण कक्षला तडे जाऊन मनपाचे करोडोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कामाच्या देखरेखीसाठी नेमण्यात आलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील  यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून भर पावसात नवी मुंबईतील खड्डे दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी