हेटवणे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सिडकोने 25 टक्के पाणी कपातीचा निर्णय
खारघर नोड मधील पाण्याची 25 टक्के पाणी कपात त्वरित रद्द करा - नगरसेविका लीना गरड
खारघर: सिडकोने खारघर वसाहतीत 25 टक्के केलेली पाणी तात्काळ रद्द करून पूर्वी प्रमाणे पूर्ववत करावे अशी मागणी नगरसेविका लीना गरड यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे.
हेटवणे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सिडकोने पाऊस आगमनापर्यंत पंचवीस टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यात खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. दरम्यान गेल्या सहा दिवसापासून हेटवणे धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे, धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे सिडकोने खारघर आणि तळोजा नोड मध्ये पंचवीस टक्के केलेली पाणी कपात, तात्काळ प्रभावाने रद्द करून पूर्वीप्रमाणे खारघर नोडला दररोज 75 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावे असे पत्र अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा , सिडको याना मुंबई. पुरवठा दिले आहे