नवी मुंबई महापालिकेने शहरातील 30वर्षे जुन्या इमारतींचे संरचना परिक्षण करण्याचे आवाहन

30 वर्षांवरील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे महापालिकेचे आवाहन  

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-17 मधील जिमी पार्क इमारतीत गत महिन्यात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर तसेच भविष्यात अशा प्रकाराच्या दुर्घटना घडु नयेत यासाठी नवी मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणुन शहरातील 30वर्षे ज्न्या इमारतींचे संरचना परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करुन घेण्याचे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याविषयी संबंधित अधिकाऱयांची विशेष बैठक घेत, शहरातील 30 वर्ष जुन्या इमारतींची तत्परतेने सूची तयार करुन त्यांची संरचना तपासणी अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

नवी मुंबई शहरातील अनेक इमारतींच्या बांधकामांना 30 वर्षांहून अधिक कालावधी झालेला आहे. त्यामुळे अशा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणेबाबत नवी मुंबई महापालिकेकडुन सातत्याने आवाहन करण्यात येत असते. मात्र, अशा सोसायटÎांमध्ये राहणाऱयां रहिवाशांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे. गत महिन्यामध्ये नेरुळ सेक्टर-17 मधील जिमी पार्क इमारतीतील ए-विंग मधील पाच माळ्यावरील स्लॅब कोसळून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

सध्या पावसाळा सुरु असल्याने या कालावधीत अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी नगररचना विभागाने 30 वर्षाहून अधिक जुन्या इमारतींच्या स्ट्रक्टरल ऑडिटसाठी यादी तयार करावी. तसेच सिडकोकडून देखील जुन्या इमारतींची माहिती घेऊन 30 वर्षे जुन्या इमारतींचे संबंधित सोसायटÎांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याची प्रक्रिया जलद सुरु करावी,अशा सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 265अ अन्वये जुन्या इमारतींना  स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याबाबत विभाग कार्यालयांकडुन नोटिसा देण्याची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले असून सदर इमारतींनी त्यांचे बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र महापालिकेची नोटीस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

सदर स्ट्रक्चरल ऑडिट योग्य रितीने होण्यामध्ये इमारतींना अडचण येऊ नये याकरिता स्ट्रक्चरल इंजिनियर यांची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी सूचित केलेल्या दोषनिवारक दुरुस्त्या करुन त्याबाबतची माहिती संबंधित विभाग कार्यालयास लेखी कळविण्यात यावी असेही इमारतींना सूचित करावे असे निर्देशित करण्यात आले आहे. एखाद्या इमारतीने सदर नोटीशीकडे दुर्लक्ष करुन स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 398 अ नुसार 25 हजार रुपये किंवा संबंधित इमारतीच्या मालमत्ता कराएवढी रक्कम यापैकी जी अधिक असेल इतक्या रक्कमेच्या दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था व केअर ऑफ नेचर सामाजिक संख्या यांच्या संयुक्त विदयमाने विविध विकास कामांचे उदघाटन