खारघर परिसरात पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ कळविण्याचे महावितरणचे आवाहन
खारघर: पावसाळ्यात विद्युत प्रणालीत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह असल्याचे जाणवताच तात्काळ जवळ असलेल्या महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन खारघरच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात सुरुवात झाली आहे. त्यात पावसाळ्यात विद्युत प्रणालीत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कडून तत्परतेने दुरुस्त केली जात आहे. तर काही ठिकाणी वेळ लागत आहे. त्यात साचलेल्या पाण्यात वीज वाहिनीत बिघाड असल्यास विजेचा धक्का (शॉक) लागू शकतो. त्यामुळे खारघर वासीयांना असे काही प्रकार निदर्शनास आल्यास विभाग निहाय असलेल्या महावितरणच्या कार्यालयात त्यांनी तात्काळ महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावे. खारघर सेक्टर एक ते दहा आणि पाच, सात आणि दहा मधील नागरिकांनी 8879970280/ 8879622350 सेक्टर सहा, अकरा आणि चौदा मधील नागरिकांनी 02227744139 / 9930269668, सेक्टर पंधरा ते पंचवीस मधील नागरिकांनी 9930269669/ 8879622251 आणि सेक्टर सेक्टर 26 ते 45 मधील नागरिकांनी 8879970283/8291691335 सोबत जोडलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन खारघरच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून करण्यात आले आहे.