प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

01 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन

 नवी मुंबई: महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

माहे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.01 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये 

दि.18 जुलै 2022 पर्यंत माआयुक्तनवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्जअसे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेअर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावाअर्जादाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालयविभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये - न्यायप्रविष्ट प्रकरणेराजस्व/अपिलसेवाविषयक - आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत 

याची नोंद घेण्यात यावीत्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे  अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती  जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीततसेच तक्रारनिवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारतजनसंपर्क विभागतिसरा मजलासे. 15 किल्ले गांवठाण जवळसी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात “अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम”