महाराष्ट्रात आता ‘शिंदेे'शाही

एकनाथ शिंदे ‘महाराष्ट्र'चे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री  

नवी मुंबई ः महाराष्ट्रात आता ‘शिंदेे'शाही अवतरण आहे. ‘महाविकास आघाडी सरकार'विरोधात बंड पुकारुन बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे ‘ठाणे'कर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ‘महाराष्ट्र'चे नवे मुख्यमंत्री पदाची तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३० जून रोजी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शपथ घ्ोतली. याप्रसंगी विधी मंडळातील ‘भाजपा'चे तसेच अपक्ष आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा २९ जून रोजी राजीनामा दिल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ‘भाजपा'चे सरकार येणार असल्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले. पण, ३० जून रोजी ‘महाविकास आघाडी सरकार'च्या विरोधात बंडखोरी केलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ‘भाजपा'च्या इतर नेत्यांसमवेत राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घ्ोऊन त्यांना शिवसेनासह इतर घटक पक्ष आणि अपक्ष अशा एवूÀन ५० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. त्याचवेळी ‘भाजपा'तर्फे राज्यात सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाला पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे ‘भाजपा'चे १०६, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ५० आणि इतर अपक्ष अशा जवळपास १७० आमदारांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी राजभवनातील दरबार हॉल येथे ‘महाराष्ट्र'चे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्ोतली. तर ना. एकनाथ शिंदे यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
तत्पूर्वी नवे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा चर्चेत असणारे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत राजभवनात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहिर केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची घोषणा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आपण मात्र मंत्रिमंडळात सहभागी होणार नसून भाजप पक्ष सत्ता स्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार आहे. यावेळी ‘भाजपा'कडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन आगामी काळात सरकार स्थापन केले जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने सर्व कार्यवाहीनंतर लवकरच मंत्रीमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटातील आणि ‘भाजपा'तील काही आमदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करुन वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेना नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरुन खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपा'चे संख्याबळ असताना देखील मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या टिकेला एक प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिमोट कंट्रोल?
‘महाराष्ट्र'च्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आपण नवीन सरकारमध्ये अर्थात मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदमध्ये जाहिर कलेले आहे. त्यामुळे नवीन शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी ‘भाजपा'तून वुÀणाची वर्णी लागणार याबाबत सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच ‘भाजपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टि्‌वट करुन उपमुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. ‘महाराष्ट्र'च्या मंत्रीमंडळात आपण सहभागी होणार नसल्याचे जाहिर करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता ‘भाजपा'च्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सुचविल्याचे टि्‌वट नड्डा यांनी व्ोÀले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्ोतली. त्यामुळे शिंदे सरकारचा रिमोट कंट्रोल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरच मार्गी लागणार : रविंद्र सावंत