खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बस सेवा सुरू करा - भाजपची मागणी

खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बस सेवा सुरू करण्याची मागणी

खारघर : बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते  वाशी दरम्यान बेस्ट बस सुरू आहे, त्याच धर्तीवर मुंबई विमानतळ ते खारघर दरम्यान बेस्ट बस सुरू करावी असे निवेदन खारघर भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमल यांच्या कडे केली आहे.

बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपो दरम्यान  AS-881 या क्रमांकाची वातानुकुलीत  बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवास भाडे दिडशे रुपये आहे. वाशी, नवी मुंबई प्रमाणे खारघर मधील नागरिक देश विदेशात नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबई विमानतळावरून उबेर, ओला, टँक्सी सारख्या महागड्या सेवांपेक्षा अधिक पटीने दर आकारतात बेस्ट बस सेवा सुरू झाल्यास रहिवासीयांसाठी अधिक सोयीचे होईल. तसे नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या अधिक वाढणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई विमानतळ ते खारघर दरम्यान बेस्ट बस सेवा सुरू करावे असे निवेदन महापौर कविता चौतमल आणि पालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी सोबत युवा नेते समीर कदम उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोसरी येथे शेतकरी संवाद दिवस व आदिवासी प्रशिक्षण दिन संपन्न