महापालिका प्रशासनाकडून डायलेसिस केंद्रामधील आवश्यक तरतुदींची पूर्तता

 डायलेसिस केंद्राच्या कार्यक्षमतेसाठी ‘आप'चा पाठपुरावा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डायलेसिस ट्रीटमेंट घेत असलेल्या १४ पेशंटस्‌ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘टीम आप नवी मुंबई'ने केलेल्या मागणीनुसार डायलेसिस केंद्रामधील आवश्यक तरतुदींची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याबद्दल ‘आप'च्या वतीने प्रशासनाचे आभार व्यवत करण्यात आले आहे. तसेच ‘आप'तर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड यांना काही मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

नवी मुंबईत डायलेसिस सेंटर चालू करण्यात आणि कार्यक्षम कारभारासाठी, टीम आप नवी मुंबई सातत्याने प्रयत्न करीत आहे. येथील पेशंटस्‌च्या मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा देखील सतत चालू असतो. महापालिका वॉर्ड पॅनल क्रमांक-३७ चे अध्यक्ष तथा समाजसेवक छाया खेमानी यांचा यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. छाया खेमानी यांच्याच पाठपुराव्यानुसार नवी मुंबईत डायलेसिस केंद्रांची वर्षभरापूर्वी स्थापना करण्यात आली.
यानंतर ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डायलेसिस केंद्रात ट्रीटमेंट घेत असलेल्या १४ रुग्णांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने ‘आप नवी मुंबई'ने केलेल्या मागणीनुसार डायलेसिस केंद्रामधील आवश्यक तरतुदींपैकी काही तरतुदींची पूर्तता केली आहे. याबद्दल ‘टीम आप'तर्फे ऐरोली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड यांची भेट घेऊन महापालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले. तसेच काही अतिरिवत मागण्यांसाठी डॉ. राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने डायलेसिस पेशंटला रक्तवाढीसाठी इंजेक्शन देण्यात यावे, त्याचप्रमाणे पेशंटला डॉक्टर सल्लागार उपलब्ध करुन देणे, अशा मागण्यांचा सदर निवेदनात समावेश आहे.

याप्रसंगी ‘टीम आप नवी मुंबई'च्या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, मानसी पवार, निवृत्त कामगार आयुक्त तथा ‘टीम आप नवी मुंबई'चे मुख्य कामगार संघटना समन्वयक देवराम सुर्यवंशी, नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, आदिंचा समावेश आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट बस सेवा सुरू करा - भाजपची मागणी