ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन ; इच्छूक उमेदवारांनी जॉबसिकर म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी 29 ते 30 जून या कालावधीत  ऑनलाईन रोजगार मेळावा

ठाणे दि. 28 (जिमाका) :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दि.30 जून 2022 रोजी दुपारी 4.00 वा. नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी नॅशनल करियर सर्विसेस (NCS) / महास्वंयम वेब पोर्टल ची माहिती या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रास तज्ञ म्हणू  आशुतोष साळी  हे मार्गदर्शन करणार असून हे सत्र गुगल मिटवर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन प्रवेशासाठी https://meet.google.com/wdv-rrwd-bft या लिंकवर क्लिक करुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.

  जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रव जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील उमेदवारांसाठी दि.. 29 जून ते 30 जून 2022 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात  आले  आहे. इच्छूक उमेदवारांनी   www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर (नोंदणी केली नसल्यास) जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी. नंतर पंडित दिनदयाळ जॉब फेयर या टॅब वर क्लिक करावे व ऑनलाईन मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त संध्या साळुंखेयांनी केलेआहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिकेने विद्यार्थ्यांची शालेय साहित्य डीबीटीच्या रकमेत १०% नी वाढ