घणसोलीत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 148 वी जयंती घणसोलीतील बुद्धघोष बुद्ध विहार येथे उत्साहात साजरी
नवी मुंबई : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 148 वी जयंती घणसोलीतील बुद्धघोष बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्धविहार बचाव कृती समिती, घणसोलीतर्फे आयोजित या जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बहुजन बांधवांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांविषयी आपले विचार प्रकट करुन छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बुद्धघोष बुद्ध विहाराचे अध्यक्ष रमेश बनसोडे, बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष सुरेश कांबळे, सचिव सचिन कटारे, उपाध्यक्ष जयराम जाधव, अनिल पाथरे, प्रकाश माळवे, अक्षय कदम, एच.बी. जाधव, राहुल बोराडे उत्तम रोकडे, धोडीराम सूर्यवंशी, राजेंद्र झेंडे, संजय माळी, ज्ञानबा सूर्यवंशी, गजानन जाधव, आर.डी.रोकडे, संभाजी रोकडे, जयवंत महाराज गुरव, संतलाल शर्मा, हनुमंत बनसोडे, प्रकाश जाधव, अविनाश कोरडे, बुद्ध विहार बचाव कृती समितीचे खजिनदार हर्षवर्धन आहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून घनसोली मध्ये बौद्ध बांधवांचे स्वतच्या मालकीचे बुद्ध विहार असायला हवे यासाठी बौद्ध बांधवांनी बुद्ध विहाराला सिडको प्रशासनाकडून जमीन मिळाली पाहिजे. अशी आग्रही भूमिका घेत मोठÎा प्रमाणात एकजूट निर्माण करत सिडकोकडे आपली भूमिका मांडण्यासाठी बुद्धविहार बचाव कृती समितीतर्फे भविष्यात निर्माण होणाऱया जमिनीच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.