राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जन संस्थेत आंतरराष्ट्रीय योगदिन दिमाखात साजरा

खारघर : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जन सशक्तिकरण संस्थेमध्ये  मंगळवार दिनांक 21जून दिव्यांग मुलांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगा प्रशिक्षका वर्षा चौधरी , ज्योती  जंगम , मेघा  कीर्दत आणि  योगिता ढमढेरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  या योगा प्रशिक्षकाकडून विशेष मुलांना, पालकांना व संस्थेमधील सर्व विधार्थींना प्रशिक्षक आणि शिक्षकांना पूरक व्यायाम प्रकार, योगप्रार्थना, योगासने प्रात्याक्षिके आणि  ध्यानधारणा यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर यांनी आपले भविष्यातील योगायचे महत्व समजावून सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

25 जून रोजी साहित्यिक डॉ.विजय चोरमारे यांचे ‘आधुनिक क्रांती राजर्षि’ या विषयावर व्याख्यान