शून्य इंधन दिवसाने एनएमएमटीची महिन्याला २३ लाखांची बचत

नवी मुंबई -:  इंधनावरील बसेसमुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमास मोठा तोटा सहन करावा लागत आहेतआणि हा होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने एनएमएमटी मे विद्युत बसेसच्या  वापरावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी  १५ जानेवारी पासून शून्य इंधन दिवस उपक्रम राबविण्यात येत आहे. आठवड्यात शनिवारी आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टी दिवशी विद्युत बस वापरात आणून इंधनावरील खर्च कमी करण्यात येत आहे. त्यामुळे महिन्याला परिवाहनची २३ लाखांची बचत होते आहे.

   इंधन बसेसमुळे होणारा तोटा कमी करण्यासाठी एनएमएमटीने आठवड्याअखेरीस शनिवारी आणि रविवारी असे शून्य इंधन दिवस आयोजित केले आहेत. या दोन दिवसात केवळ विद्युत बस सेवेत ठेवून, इंधन वरील खर्च कमी करण्यासाठी तसेच पर्यावरण पूरक शहर ठेवण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी ते शुक्रवारच्या तुलनेत ३०% ते ४०% बस शनिवारी, रविवारी उभ्या असतात.  त्याऐवजी विद्युत बस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे त्या दिवसांत ६ हजार ते दहा हजार लिटर इंधन बचत होत असून ३०  लाखांचा खर्च कमी होत आहे तर विद्युत बसेचा शून्य इंधन दिवशी महिन्याला ७  ते साडे सात लाख खर्च होत असून एकंदरीत नवी मुंबई परिवहनाची २३  लाखांची बचत होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे योग दिन साजरा