गुटखा विक्री करणा-या दुक्कलीला गुन्हे शाखेने केले जेरबंद

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने मानावाच्या जिवीतास  हानीकारक असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखुची विक्री करणाऱया दोघांना पनवेलच्या आदई गावातून अटक केली आहे. मुकेशकुमार रामचंद्र गुफ्ता (39) व सुमित शांतीलाल जोशी (35) अशी या दोघांची नावे असून गुन्हे शाखेने त्यांच्याकडुन 1 लाख 34 हजार रुपये किंतमीचा प्रतिबंधीत असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखु साठा जफ्त केला आहे.  

नवी मुंबई परिसरात नशा मुक्त अभियानातंर्गत विशेष मोहिम राबविण्याबाबत पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या पथकाला अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले होते. सदर पथक गत आठवडÎात पनवेल परिसरात पेट्रोलिंग करत असताना आदई गावात राहणा-या मुकेशकुमार रामचंद्र गुफ्ता (39) याच्या घरामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर घरावर छापा मारला.  

यावेळी गुफ्ता याच्या घरामध्ये सुमारे 1 लाख 34 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आढळुन आला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गुटखा जफ्त करुन मुकेशकुमार गुफ्ता याला अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेने गुफ्ता याची अधिक चौकशी केली असता, त्याला सुमित शांतीलाल जोशी (35) हा गुटख्याचा माल पुरवित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सुमित जोशी याला अटक केली आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सुमित जोशी याच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात यापुर्वी एक गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शून्य इंधन दिवसाने एनएमएमटीची महिन्याला २३ लाखांची बचत