एफ.जी.नाईक महाविद्यालयात योग दिन संपन्न

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या साह्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप नाईक, डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे सहयोगी प्रा.डॉ.सविता बलकर आणि योग प्रशिक्षक संदीप शिकारे, रविन्द्र पष्टे आणि दिलीप गोंधळी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमावेत विविध योग आसनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.  

 सदर कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संदीप नाईक यांनी प्रत्येकाने संतुलित व सात्विक जीवन शैली अंगीकारताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग कसा महत्त्वाचा आहे यावर त्यांनी भाष्य केले. त्याचप्रमाणे भारताची प्राचीन जीवनशैली 21 व्या शतकात देखील मानवाला जीवन जगण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचा प्रसार केल्यामुळे व भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विशेष महत्त्व प्राफ्त झाल्याचे सांगितले. यावेळी डॉ.सविता ढाले यांनी आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण जीवनशैलीवर मात करण्यासाठी व निरोगी आणि शांततापूर्ण आयुष्य व्यतीत करण्यासाठी योगाचे महत्व विशद केले.  

यावेळी एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, रा.फ.नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, श्रमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक तसेच उपमुख्याध्यापक नरेंद्र म्हात्रे, पर्यवेक्षक रविन्द्र पाटील, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे प्राध्यापिका जयश्री दहाट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचा समावेश करण्याचा निश्चय केला.  

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

रेल्वे स्थानक परिसरातील जाहिरात फलक बनले धोकादायक