एपीएमसी फळ बाजारातील अनधिकृत बांधकमांवर कारवाईची मागणी
नवी मुंबई -: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ बाजार अवरातातील गाळ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून त्याचा रहिवासी वापर सुरू आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर एपीएमसी प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी मनसे सहकार सेना प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी एपीएमसी उप सचिव यांच्याकडे केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही संपूर्ण पने व्यावसायिक वापरासाठी आहे. मात्र येथील फळ मार्केटमध्ये बहुतांश गाळे धारकाने नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. सदर अनधिकृत बांधकामामुळे याठिकाणी बांगलादेशी, परप्रांतीय तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वास्तव्य करत असल्याने बाजार समितीमधील कायदा सुव्यवस्था ही धोक्यात येत आहे. तर या दाटी वाटीच्या वस्तीमुळे याठिकाणी आग किंवा इतर कोणता अनुचित प्रकार घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्यासाठी शक्यता आहे. .
त्यामुळे या सर्व अनधिकृत बांधकामांची एपीएमसी प्रशासनाने प्रत्यक्ष पडताळणी करून दोषींवर येत्या दहा दिवसांच्या आत कारवाई करवाई.आणि एपीएमसी प्रशासनाने ही करवाई न केल्यास एपीएमसी विरोधात मनसे स्टाईल ने तीव्र आंदोलन केले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी एपीएमसी प्रशासनाची राहील असा इशारा ही यावेळी शिंदे यांनी दिला आहे. सत्यवान गायकवाड, अरुण पवार,अनिल चिंदालिया,प्रथमेश शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.