टोबॅको अव्हेरनेस दिनानिमित्त सिडको भवनमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती
नवी मुंबई : वर्ल्ड टोबॅको अव्हरनेस दिनानिमित्त तंबाखू सेवन प्रतिबंधात्मकेतेचे ब्रीदवाक्य हाती घेवून सिडको मुख्यालयात तंबाखूविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खारघर येथील टाटा हॉस्पीटलमधील सेंटर फॉर कॅन्सर एपिडिमियोलॉजी, टीएमसी-ऍक्ट्रेक डॉक्टरांच्या पथक व सिडको व्यवस्थापन आणि सिडको एम्पालाईज युनियनच्या सहकार्याने आयोजित या जनजागृतीपर कार्यक्रमात सिडकोतील कर्मचारी मोठÎा संख्येने सहभागी झाले होते.
सिडको भवन मधील सातव्या मजल्यावरील सभागृहात आयोजित या जनजागृतीपर कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या पथकाने तंबाखू सोडा, जीवनाशी नाते जोडा या ब्रीदवाक्याला अनुसरुन तंबाखू सेवनामुळे होणाऱया आरोग्याच्या धोक्यांबद्दल माहिती देतानाच कोटपा कायद्याची तसेच तंबाखू सोडण्यासाठी सहाय्यक मार्गदर्शन, तंबाखू क्विटलाईन सेवेद्वारे मदतीचा हात आदी विषयाची उपयुक्त माहिती उपस्थित कर्मचऱयांना दिली.
यावेळी सिडको एम्फ्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस जे.टी. पाटील, कार्मिक अधिकारी विशाल ढगे तसेच उपाध्यक्ष नरेंद्र हिरे आणि संजय पाटील उपस्थित होते. सेंटर फॉर कॅन्सर एपिडिमियोलॉजी, टीएमसी-ऍक्ट्रेक (टाटा हॉस्पीटल, खारघर), प्रभारी अधिकारी-वैद्यकीय अधिकारी डॉ.अमय ओक, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवरंजिनी के., वैज्ञानिक सहाय्यक डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय अधिकारी मनीषा यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाल्मली चव्हाण, समुदेशक मनीषा यादव आणि जनसंपर्क अधिकारी वैभवी कोरगावकर आदी उपस्थित होते.