दहावीचा निकाल जाहिर
राज्य-९६.९४ टक्के, मुंबई-९६.९४ टक्के, नवी मुंबई-९९.९८ टक्के
नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'तर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेरीस १७ जून रोजी संपली. दहावी परीक्षेचा ‘मंडळ'तर्फे ऑनलाईन निकाल जाहिर करण्यात आला. त्यानुसार राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. दहावी परीक्षा मध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.२७ टक्के तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) लागला आहे.
‘कोकण'ची पुन्हा बाजी...
नियमित विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोल्हापूर विभाग (९८.५० टवव्ोÀ) दुसऱ्या क्रमांकावर आहे. निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९६.९४ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या वर्षीची दहावी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत पार पडली होती.
राज्यात दहावी परीक्षेसाठी १५ लाख ८४ हजार ७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये सर्वाधिक १ लाख ९ हजार ४९ विद्यार्थी पुणे विभागातील असून त्या खालोखाल मुंबईतील १ लाख ६ हजार १९६ विद्यार्थ्यांचा समावेश प्राविण्य श्रेणीत आहे. नागपूर विभागातील ५४ हजार ३८३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत.
मुंबई विभागीय मंडळ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत एकूण ३४७६८३ नियमित विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ३४७६५७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले. यात एवूÀण ३४७५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नवी मुंबईत १५३ पैकी १५१ शाळांचा निकाल १०० टक्के
ठाणे जिल्ह्यातंर्गत येणाऱ्या नवी मुंबई महापालिका हद्दीतील १५३ शाळांमधील एकूण १५९५७ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेकरिता नोंदणी केली होती. त्यापैकी १५९५७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होऊन १५९५४ (९९.९८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवी मुंबईतील १५३ पैकी १५१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.