“प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी” योजनेकरिता हरकती व सूचना नोंदविणेबाबत मुदत

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरीता महानगरपालिकेने दिव्यांगांकडून दि11 फेब्रुवारी 2019   दि .06 जून 2019  रोजी वृत्तपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविले होते.   त्यास अनुसरून एकूण 714 अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. या अर्जदारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली असून सदर यादी अंतिम करण्याकरीता प्रतिक्षा यादीमधील अर्जदारांकडून दि.20 जून 2022 पासून दि.24 जून 2022 रोजी सायं 5 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) हरकती  सूचना मागविण्यात येत आहेत.

 ज्या दिव्यांगांनी दि11 फेब्रुवारी 2019  दि.06 जून 2019 रोजीच्या वृत्तपत्र जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने  विहित वेळेत महानगरपालिकेच्या   मालमत्ता विभागाकडे अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनाच हरकतीसूचना  नोंदविता येतील.

 हरकती/सूचना  नोंदविताना त्याला पूरक अशी प्रमाणित विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.

जे अर्जदार स्वतः शासकीयनिमशासकीयमहानगरपालिकासिडकोएम.आय.डी.सी., इत्यादी सार्वजनिक प्राधिकरणामध्ये नियमित /करार/ठोक पगारावर सेवेत असतील अथवा, ज्यांनी वरील प्राधिकरणांकडून यापूर्वी व्यावसायिक जागा उपलब्ध करून घेतलेली आहे.  अथवा, ज्या अर्जदारांना अन्य कुठलेही उत्पन्नाचे स्त्रोत असेल असे अर्जदार या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत.   ज्या अर्जदारांनी अर्जात केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पत्ता नमुद केला आहेमात्र त्याबाबत पुरावा सादर केलेला नाही अशी नावे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील अर्जदारांच्या यादीत समाविष्ठ आहेतसदर यादीतील अर्जदारांनी हरकत / सूचना नोंदविताना महानगरपालिका क्षेत्रात राहत असल्यास तसा पुरावा सादर करावा.    

अर्जदारांची प्रतिक्षा यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर online तसेच मालमत्ता विभाग, नमुंमपा मुख्यालय त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या 08 विभाग कार्यालये याठिकाणी बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

अर्जदारांनी आपल्या हरकती / सूचना  लेखी स्वरूपात उपआयुक्त (मालमत्ता विभागनवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, तळ मजला, मालमत्ता विभाग, प्लॉट क्र .01 सेक्टर -15A , सीबीडी  बेलापूर, नवी मुंबई - 400614 यांच्याकडे  दि24 जून 2022 सायं 5 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळुन) पोहचतील अशा प्रकारे सादर करावयाच्या आहेतत्यानंतर प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे/ कुरिअर द्वारे प्राप्त हरकती सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दहावीचा निकाल जाहिर