ऐरोली मध्ये मनसे तर्फे आयोजित शिबिरात ७९ दात्यांचे रक्तदान
नवी मुंबई : 'महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना'चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्त ऐरोली सेक्टर-२९ मधील मनसे जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरात २०० गरीब, गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
ऐरोली सेक्टर-२९ मधील मनसे जनसंपर्क कार्यालयात गणेश म्हात्रे यांच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ऐरोली परिसरातील ७० दात्यानी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी निलेश बाणखेले, कल्पेश बेलोसे, राकेश पवार, सचिन निकम, हनीफ शेख, छगन पाटील, विधीज्ञ महेश पाटील, पियूष म्हात्रे, विलास कांबळे, शंकर जोशी, आदी उपस्थित होते.