जलकुंभाच्या पाडकामामुळे वाशी मार्केट महिना भर बंद

नवी मुंबई -:वाशी सेक्टर १५ येथील धोकादायक  जलकुंभ पाडण्याचे काम नवी मुंबई महानगर पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या  ठिकाणी असलेले मार्केट  महिनाभर बंद ठेवण्यात आले आहे.मात्र मार्केट जरी बंद असले तरी याठिकाणी घरात बदल करून गाळे तयार करण्यात आलेली दुकाने सुरूच असल्याने ग्राहकांची वर्दळ कायम आहे. त्यामूळे  जलकुंभ पडताना जर काही भाग  रस्त्यावर पडला तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे मनपाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नवी मुंबई  हे सिडकोने वसवले असल्याने शहरात आजही मोठ्या  प्रमाणात सिडको कालीन जलकुंभ असून त्याद्वारे शहर वासियांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. मात्र हे जलकुंभ आता जीर्ण होऊन धोकादायक झाले आहेत आणि मागील वर्षी सेक्टर १० मधील जलकुंभ पडून त्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे शहरातील जुने धोकादायक जलकुंभ पाडून त्याजागी नवीन जलकुंभ बांधण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. त्या धर्तिवर वाशीतील सेक्टर १५ येथील जलकुंभ पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र  या जलकुंभा शेजारीच गणेश मार्केट नावाने मोठे मार्केट असल्याने याठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पाडकाम  करताना  कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणुन मनपाच्या वतीने येथील मार्केट एक महिना बंद ठेवले आहे. मात्र मार्केट जरी बंद ठेवले असले तरी याठिकाणी घरात बदल करून गाळे तयार करण्यात आलेली दुकाने सुरूच असल्याने ग्राहकांची वर्दळ कायम आहे. त्यामूळे टाकी पडताना जर काही भाग  रस्त्यावर पडला तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे मनपाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली मध्ये मनसे तर्फे आयोजित शिबिरात ७९ दात्यांचे रक्तदान