पाणी समस्या मुळे घरकुल रहिवासी त्रस्त, सह्यांची मोहीम सुरू

खारघर : खारघर सेक्टर 15 मधील घरकुल वसाहतीत अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. मात्र आश्वासन केवळ नावापुरते असल्यामुळे घरकुल मधील राहिवासीयांनी एकत्र येवून पाणी समस्या सोडवण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.

     सिडकोने खारघर शहराची निर्मिती करताना दोन हजार साली सेक्टर पंधरा मध्ये अल्पउत्पन्न घटकासाठी घरकुल वसाहतीत ए बी सी डी या चार विंग मध्ये   1440  सदनिका उपलब्ध करून दिले. सुरुवातीच्या काळात वसाहतीत योग्य प्रकारे पाणी पुरवठा केला जात असे मात्र गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे राहिवासीयांनी सिडकोच्या खारघर कार्यालयात निवेदन सिडकोच्या विरोधात घोषणा दिल्यावर दुसऱ्या दिवशी सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीला भेट देवून पाहणी केली, दरम्यान आठवडाभर पाणी पुरवठा सुरळीत झाला,मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. दरम्यान घरकुल वसाहती मधील पाणी समस्या दूर करण्यासाठी काही राजकीय कार्यकर्त्यांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले मात्र,आश्वासना पलीकडे काही केले नाही. राजकीय कार्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास नसल्यामुळे घरकुल वसाहती मधील  प्रविण कदम, भिमदेव नलावडे, सुरेश वाघमारे, अशोक कोळसुलकर, महेंद्र सोनवणे, एकनाथ ढंगारे, सुमित्रा चव्हाण,  दीपक पांचाळ , कौसल्या साळवे, मोराजकर, प्रदीप जाधव, सुनीता काळे व इतर राहिवासीयांनी एकत्र येवून पाणी समस्याच्या विरोधात एकवटले असून मोठ्या प्रमाणात सह्यांचे मोहीम हाती घेतली आहे.सह्यांची मोहीम झाल्यावर सिडकोवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलकुंभाच्या पाडकामामुळे वाशी मार्केट महिना भर बंद