एपीएमसीतील उघडया विजवाहिन्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
नवी मुंबई-:.वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवरामध्ये असणाऱ्या सर्व बाजार आवारा मधील उघड्याा व नादुरुस्त वितरण पॅनल व केबल दुरुस्तीविना बऱ्याच वेळा याठिकाणी अपघात होत आहेत. तर सदर दुरुस्तीचा प्रस्ताव महावितरण ने जिल्हाधीकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवलं असून तो मंजुरी विना प्रलंबित असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा अशी मागणी मनसे कामगार सहकार सेनेतर्फे ठाणे जिल्हाधकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून या ठिकाणी बाजार समिती कर्मचारी, व्यापारी, वाहुतकदार, ग्राहक, माथाडी कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक व अश्या अनेक वर्गाची सतत वर्दळ असून बाजार समिती ची स्थापना झाल्या पासून बाजार आवारातील विद्युत डी.पी. व केबल ची मोठ्या प्रमाणात नादुरुस्त असल्याने याठिकाणी विजेचा झटका लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
तर भविष्यात अश्या प्रकारच्या घटना घडून मोठ्याा प्रमाणात अपघात होवून मनुष्य हानी अथवा मालमत्ता नुकसान होऊ नये म्हणून महावितरण तर्फे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत तात्रिक मान्यता प्राप्त प्राधान्य प्रस्ताव प्रशासकीय मंजूरीसाठी सादर केलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा योग्य तो वापर करून सदर प्रस्ताव तत्काळ मंजूर करून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार आवारात असणाऱ्या उघडया व नादुरूस्त वितरण पॅनेलच्या कामचा प्रस्ताव मंजूर करून तात्काळ चालु करण्यासाठी आदेशीत करण्यात यावे अशी मागणी मागणी मनसे कामगार सहकार सेनेतर्फे करण्यात आली आहे. यावर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लवकरच सदर प्रस्तावास मंजुरी देऊन महावितरणला कळवू असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, प्रथमेश शिंदे, अरुण पवार,अनिल चिंदालिया आदी जण उपस्थित होते.