खचलेल्या रस्त्याच्या जागी पुन्हा मृत्यूचा सापळा

उरण : जेएनपीटी मार्गावरील खचलेल्या रस्त्याच्या जागी कोस्टल रोडच्या सुरुवातिलाच मोठा खड्डा निर्माण होऊन मृत्यूचा सापळा निर्माण झाला आहे याकडे मात्र नॅशनल हायवे अथोरिटी चे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवाल प्रवाशी नागरीकामधून विचारला जात आहे.

         जेएनपीटी महामार्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्ध आहे.मागील काही महिन्यांपूर्वी जेएनपीटी महामार्गाचा रस्ता द्रोणागिरी जवळच्या इथे खचून भगदाड पडले होते. आत्ता मात्र तो रस्ता तयार होऊन वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.मात्र उड्डाण पुलाच्या खालून कोस्टल रोडकडे आणि कोस्टल रोडकडून जेएनपीटी हायवे कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या रस्त्यावरील काँक्रीट रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा निर्माण झाला आहे.सदर खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले तर पावसाळ्यात मोठा खड्डा पडून रात्री अपरात्री अपघात होण्याची संभवना नाकारता येत नाही. तरी नॅशनल अथोरीटीने सदर रस्त्याच्या खड्ड्यांकडे, रस्त्याच्या साईट पट्ट्याकडे लक्ष केंद्रित करून पूर्ववत करावा अशी मागणी मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांच्या कडून करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळमध्ये इमारतीचे स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, 7 जखमी