कांद्याचे दर वधारण्यास सुरुवात
नवी मुंबई -: मागील एक आठवड्यापूर्वी वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात कमी असलेल्या कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. दोन दिवस आधी १४रु ते १५ रु प्रतिकिलो मिळणारे कांदे आता १५रु ते १७ प्रतिकिलो रुपयांवर विक्री होत आहे.
पावसाळ्यात कांद्याचे दर वधारत असतात. तसेच पावसाळा आधी ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी असते. त्यामुळे पावसाची चाहूल लागताच घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात सध्या ८७ गाड्या दाखल होत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यांत आणि त्यानंतर ही दर वधारतात . त्यामुळे पावसाळापूर्व तयारी म्हणून ठेवणीचे कांदे साठवणूक करण्यास सुरुवात होते. त्यामुळे बाजारात अधिक आवक असून ही दर वधारत आहेत. पुढील कालावधीत दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे.