कॅन्सरमुक्ता... सौ.अलका भुजबळ

कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन सध्या कॅन्सर रुग्णांना विविध माध्यमातून दिलासा देण्याचे व्रत अंगिकारलेल्या सामाजिक कार्यकत्र्या तसेच अभिनय, क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य दाखविलेल्या महानगर टेलिफोन निगममधील माजी कर्मचारी, बास्केटबॉलपटु, प्रशिक्षक आणि नुकताच ज्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रवेश केला आहे, अशा कॅन्सरमुक्ता सौ. अलका देवेंद्र भुजबळ यांच्याशी ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी साधलेला संवाद.


सकारात्मक दृष्टीकोन, योग्य उपचार आणि तज्ञ डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कॅन्सर हमखास बरा होतो, असे स्पष्ट करतानाच आपण सेवा बजावत असलेल्या महानगर टेलिफोन निगम लि.चा माझ्या जडण-घडणीत मोठा वाटा आहे. एमटीएनएल मधील सर्व सहकारी, वरिष्ठ आदि सर्क्रिंना सांभाळून घणारे असल्याने काम, घर, छंद, एकांकिका, दूरचित्रवाणी मालिका, क्रीडा या साऱ्यामध्ये समन्वय साधत पुढे जाता आल्याची कृतज्ञ भावनादेखील सौ. अलका भुजबळ यांनी व्यक्त केली.


► एमटीएनएल मधील आपला प्रवास कसा?
- सर्वप्रथम मी एमटीएनएलची खूपच आभारी आहे. एमटीएनएल मध्ये मी १९८२ मध्ये कामाला लागले. एमटीएनएल मध्ये कर्मचाऱ्यांना खूप सुरक्षतिता आहे. त्यामुळे मी जे काही आहे, ती एमटीएनएल मुळेच घडले आहे. एमटीएनएलमध्ये शिपट ड्युटी असल्याने छंद जोपासणे, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळायचा. काम सांभाळून इतर आवडत्या गोष्टींकडे लक्ष देत येत होते. एकंदरीतच एमटीएनएल असे माध्यम आहे की, जेथे आपण आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतो. 

एमटीएनएल मधील नोकरी सोबतच बंदिनी/महाश्वेता  मालिकेतील काम, व्हॉलीबॉल यामध्ये नैपुण्य या सगळ्याची सांगड कशी घातली?
मी कार्यालयाची ड्युटी सांभाळून या सगळ्यांसाठी वेळ दिला आहे. ड्युटी संपली की आम्ही सराव करीत असू. एमटीएनएलचे स्वतःचे ग्राऊंड होतेच; नंतर आम्ही आंतर निगम स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. त्यावेळी आम्हाला स्पधेसाठी सुट्टी, सवलत मिळायची. यानंतर आम्ही आंतर राज्य स्पर्धांमध्ये सहभाग घतला. या स्पर्धांवेळी आमचा बीएसएनएल सारख्या संस्थेतील तंत्रज्ञान अवगत असलेल्या (टेक्निकल पर्सन) खेळाडुंशी संबंध आला. त्यांच्यामुळे आम्ही क्रीडापटु असून देखील आम्हाला टेक्निकल ज्ञान मिळत गेले. याशिवाय माझ्या प्रगतीत क्रीडा क्षेत्रासह सांस्कृतिक क्षेत्राचाही वाटा आहे. एमटीएनएल मधील विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मी सहभाग घतलेला आहे. त्यामुळे अभिनयाची आवड निर्माण झाली. मला सिरीयलमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. बंदिनी, श्वेतांबरा सारख्या मालिकांमध्ये मी काम केले आहे. त्यावेळी आमच्या सिरीयल शुटींगचे शेड्युल्ड देखील शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी ठेवले जायचे. त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला. त्यामुळे माझे छंद जोपासायला मला एमटीएनएल मधील शिपट ड्युटी खूपच फायद्याच्या ठरत गेली.

► कार्यालयीन काम, क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्रातील पारितोषिकांबद्दल?
- एमटीएनएल मध्ये मी सन १९९१ पासून व्हॉलीबॉल खेळायला सुुरुवात केली. यानंतर एमटीएनएल मधील शेवटची तीन वषे व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणूनही काम करण्याची मला संधी मिळाली आहे. त्यावेळी प्रशिक्षक असताना आमच्या संघाला स्पधेमध्ये तिसरा क्रमांक मिळाल्याचा अभिमान आहे. विविध एकांकिका स्पर्धांमध्येही मी सहभाग घतला असून यात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. श्राध्द मालिकेत मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीएनएल मध्ये दिग्दर्शक तसेच कलाकार, क्रीडापटु आणि प्रशिक्षक देखील घडले आहेत. 

कॅन्सरचे निदान कसे झाले? या टप्प्यातील मानसिकतेबाबत?
- २०१७ चा काळ माझ्यासाठी वाईट  होता. पण या वाईट काळात पती देवेंद्र भुजबळ आणि मुलगी देवश्री भुजबळ यांची खूप मोलाची साथ तसेच एमटीएनएल मधील सहकाऱ्यांना दिलेला आधार खूपच उमेद देणारा होती. पती देवेंद्र भुजबळ यांची साथ तर अवर्णनीयच आहे. नवरात्रीचा काळ होता; पोटात खूप दुखू लागले होते. डॉक्टरांच्या गोळ्यांनी दुखणे बरेच होत नव्हते. प्राथमिक उपचार कामी येत नव्हते. पती देवेंद्र भुजबळ औरंगाबादला होते. त्याचवेळी वेदना असहय्य झाल्याने मुलीकडे चेंबूरला कशीबशी गेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ११ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वात प्रथम कॅन्सरचे निदान झाले. पण, त्यावेळी मला ट्युमर असून तो ऑपरेशन केल्यावर बरा होईल असे कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी सांगितले. यानंतर ऑपरेशनसाठी मी होकार देताच दुसऱ्या दिवशीच डॉ. रेखा डाऊर, डॉ. परेश जैन आणि डॉ. मेनन यांच्या माध्यमातून माझ्या ट्युमरवर जवळपास पाच ते साडेपाच तास ऑपरेशन चालले. त्याआधीच सकाळीच पती देखील मुंबईत पोहोचले. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी मला सर्वप्रथम कॅन्सरबाबत कल्पना दिली. पण, माझा कॅन्सर सेकंड स्टेजच्या सुरुवातीचा (२ए) असून ऑपरेट केलेल्या ट्युमरची पूर्ण तपासणी झाल्याचेही डॉक्टरांनी मला सांगितले. फक्त आणखी चांगले उपचार म्हणून केमो थेरपीच्या सहा सायकल्स दिल्या. यादरम्यान मला डॉक्टरांनी कॅन्सर पूर्णपणे बरा होत असल्याने घाबरण्यासारखे त्यात काही नाही. फक्त सकारात्मक दृष्टीकोन मनात ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर मी डॉक्टरांच्याच सल्ल्याने आणि योग्य उपचार घऊन कॅन्सरमधून बरी झाली आहे. तरीही आणखी पाच-सहा वषे याबाबत योग्य ती काळजी देखील घणार आहेच.

कॅन्सरच्या केमो टेस्ट झाल्या; कॉमा पुस्तक आणि डॉक्युमेंटेशन बाबत कसे सुचले?
- खरे बघायला डॉक्टरांनी सकारात्मक दिलासा दिल्यामुळे माझ्या मनातली कॅन्सर विषयीची भिती हळूहळू गेली. सुरुवातीला पहिल्या केमो नंतर केस गळतील, थोडा त्रास जाणवेल याबाबत डॉक्टरांनी कल्पना दिली होती. त्यामुळे केमो थेरपीनंतर केस गळू लागल्याने मुलगी घाबरली. पण मी मनातली भिती कुटुंबियांना जाणवू दिली नाही. यानंतर मी कॅन्सरवरील अनुभव लिहिण्याचा विचार केला. मात्र केमोनंतर लिहिणे अवघड झाले. त्यामुळे पती देवेंद्र भुजबळ आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर मला एक लेखनिक देण्यात आला. त्यानंतर मी माझे अनुभव त्याला सांगू लागले आणि तो शब्दबध्द करु लागला. असे जवळपास मी पाचव्या केमोर्पयंत केले. माझा कॅन्सरबाबतचा अनुभव शब्दांकित होऊन तो पुस्तक स्वरुपात झाला. अखेर खूप विचारांती त्या पुस्तकाला कॉमा असे नाव दिले आणि माझे कॉमा पुस्तक प्रकाशित झाले.

कॉमा खूप जणांनी वाचले, मग डॉक्युमेंटेशन आणि राज्यपालांच्या हस्ते त्याचे प्रकाशन, याबद्दल?
- कॅन्सरवरील अनुभव कॉमा या पुस्तकाद्वारे प्रकाशित केले. या पुस्तकाच्या एक हजार प्रती संपल्याने त्याची दुसरी आकत्ती लवकरच येत आहे. यादरम्यान डॉक्युमेंटेशन करणाऱ्या आशिष निननूरकर यांच्याशी आमचा संपर्क आला. कॉमा पुस्तक बहुतेक जणांनी वाचले.. त्याप्रमाणे त्यांनीदेखील कॉमा वाचले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कॉमा पुस्तकावर डॉक्युमेंटरी करायचे ठरविले. त्यानुसार डॉक्युमेंटरी खूपच चांगली झाली. मग, दस्तुरखुद्द महामहीम राज्यपाल डॉ. भगतसिंग कोश्यारी यांना आम्ही डॉक्युमेंटरीच्या प्रकाशनासाठी शब्द टाकला. अन्‌ राज्यपाल डॉ. कोश्यारी यांनी देखील त्वरित होकार दर्शवून वेळ दिला व डॉक्युमेंटरीचे प्रकाशन राज्यपाल डॉ. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले.

►कॅन्सर बाबत इतरांना संदेश?
- कॅन्सर आजार आता पूर्णपणे बरा होतो. कॅन्सरचे उपचार खर्चिक असले तरीही त्यासाठी काही ठिकाणी मदत मिळते. माझ्या सुदैवाने मला एमटीएनएलची मदत झाली. त्यामुळे सगळ्यांनी आपला आरोग्य विमा उतरविणे गरजेचे आहे. छोट्या-मोठ्या आजारात आरोग्य विमा फायदेशीर असून मोठ्या आजारांमध्ये विमा खूपच उपयोगी ठरतो. याशिवाय कॅन्सरसह इतर लहान-मोठ्या आजारात नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घतली पाहिले. ड्रायफ्रुटस्‌, हेल्थी फुडस्‌, प्रोटीनयुक्त आहार नियमितपणे घतला पाहिजे. गरम आणि ताजे अन्न खाणे अधिक उत्तम आहे. कॅन्सरसारख्या मोठ्या  आजारावेळी घाबरुन न जाता रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावेत. मानसिक ताण, दगदग न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपण कॅन्सरच काय इतर कोणत्याही आजारावर मात करु शकतो, असा माझा ठाम विश्वास आहे. 

Read Previous

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेना हायकोर्टाचा दणका, भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना मोठा दिलासा

Read Next

 सागरपुत्र शुभम वनमाळी