शाळा सुरू करुण्याबाबत घाई नको - नवी मुंबई भाजप

नवी  मुंबई -: १३ जूनपासून नवी मुंबईतील शाळा सुरू होणार आहेत तर काही शाळा सुरू देखील झाल्या आहेत. मात्र शहरात सध्या कोरोना आजाराने पुन्हा डोके वर काढले असून रोज १५० च्यावर रुग्ण आढळत आहेत आणि अशा परिसथितीमध्ये शाळेत होणारी मुलांची गर्दी पाहता कोविड संक्रमण अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामूळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू करण्याबाबत मनपा आयुक्तांनी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी नवी मुंबई भाजप चे सचिव विजय घाटे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२० मध्ये कोविडची साथ आल्यानंतर शासनाने लावलेल्या टाळेबंदित सर्व शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होता. मात्र ऑक्टोबर २०२१ पासून कोविड संक्रमण कमी झाल्यानंतर शासनाने हळू हळू सर्व शाळा सुरू करण्याबरोबर १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणावर भर दिला. मात्र १२ वर्षातील मुलांना कुठलल्याही प्रकारची लस अजून दिली नाहीआणि अशी परिस्थिती असताना आता कोविड आजाराने पुन्हा डोकं वर काढले आहे. एकीकडे कोविड  संक्रमण वाढत आहे तर दुसरीकडे सर्व शाळा सुरू होत आहेत या शाळा केवळ फी वसूलकरण्यासाठीच सुरू केल्या जात असल्याचा आरोप घाटे यांनी केला आहे. कारण एकाच वेळी जर सर्व शाळा सुरू केल्या तर कोविड संक्रमण अधिक फैलावून मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आधी ८ ते १० वी पर्यंत वर्ग सुरू करावे आणि एक ते दीड महिना या मुलांवर कोविडचां काही परिणाम होत आहे का ? याचे निरीक्षण करूनच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीनवी मुंबई भाजप चे सचिव विजय घाटे यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई ठरणार वाचन संस्कृती जपणारे शहर