सीबीडीत योग शिबीर संपन्न
नवी मुंबई- सीबीडी येथील समाजसेविका सौ कांचन अशोक गुरखे यांच्यावतीने विभागातील जेष्ठ नागरिक, महिला आणि युवक यांच्या सुदृढ आरोग्यासाठी, भारतीय योग संस्थेच्या राजकुमारी सिह यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसीय योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सीबीडी, सेकटर-१५ येथिल नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, तसेच, रोजच्या जीवनात आनंद मिळावा म्हणून माणसानेआपल्या दैनंदिन जीवनात आनंद मिळावा म्हणून योग क्रिया अत्यंत उपयुक्त असल्याने, योग क्षेत्रांत कार्यरत असलेल्या भारतीय योग संस्था यांच्या सहकार्याने, समाजसेविका कांचन गुरखे यांनी विभागातील नागरिकांसाठी पाच दिवसीय योग शिबिर सेकटर-१५ येथील नागा गणा पाटील उद्यानात योगाचार्य राजकुमारी सिह यांच्या मार्गदर्शनाखाली योग आयोजित केली होती. सदर योग शिबिरात पोटाचे, पित्त, डायबेटीस आदी आजारासाठी करावयाच्या योग क्रियाचे प्रात्याक्षिकद्वरे समजुन सांगण्यात आले. या योग शिबीराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन, योग शिक्षणाचा लाभ घेतला.