एपीएमसी बाजारातील नाले सफाई अंतिम टप्प्यात
नवी मुंबई :- एपीएमसी.बाजारातील कांदा बटाटा मार्केट,मसला आणि.धान्य बाजारातील मान्सून पूर्व नालेसफाई अंती टप्पात आली असून आता पर्यंत ८० ते ८५ %नाले सफाई पूर्ण केल्याची. माहीती एपीएमसी स्वच्छता विभागाने दिली आहे.
पावसाळ्यात एपीएमसी बाजारात पाणी भरू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व नाले सफाई ठेकेदारांमार्फत करवून घेतली जाते. यासाठी स्वतंत्र ठेके दिले जातात.यातील भाजी आणि फळ बाजाराची नाले सफाई ही वार्षिक देखभाल ठेक्या अंतर्गत केली जाते. तर कांदा बटाटा, मसाला आणि धान्य बाजार मिळून मान्सून पूर्व नालेसफाईचा स्वतंत्र ठेका दिला जातो आणि या नालेसफाई ने आता जोर पकडला असून ही नालेसफाई अंतिम टप्प्यात आली आहे. आता पर्यंत ८0 ते ८५% नालेसफाई पूर्ण झाली असून येत्या दोन तीन दिवसात १००% नालेसफाई पूर्ण झालेली असेल असे मत एपीएमसी स्वच्छता निरीक्षक किरण घोलप यांनी व्यक्त केले आहे.