मानवी हस्तक्षेपामुळे फ्लेमिंगोचे अधिवास आले धोक्यात ?
नवी मुंबई -: कुत्रिम फ्लेमिंगो लाऊन फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबई शहराचा आज मोठा गवगवा केला जात आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या जिवंत फ्लेमिंगोच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढत चालल्याने या फ्लेमिंगोचे अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील फ्लेमिंगोचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमिंकडून होत आहे.
नवी मुंबईतील सिवुड सेक्टर ५० येथील. दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येत असतातआणि फ्लेमिंगो बघण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणीं पर्यटक येत असतात. मात्र सदर पर्यटक हे फोटो काढण्यासाठी थेट तलावात उतरत आहेत. त्यामूळे या ठिकाणी फ्लेमिंगो घाबरून असतात.आणि ही परिस्थीती अशीच कायम राहिली तर येणाऱ्या काळात मानवी हस्तक्षपामुळे येथील फ्लेमिंगोची संख्या रोडवण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत आजही मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत. मात्र या पाणथळ जागेत मनपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाुळे डेब्रिजचा भराव टाकत असल्याने या पाणथळ जागा नष्ट होत चालल्या आहेत.त्यामुळे स्वच्छ भारत अभियनांतर्गत नवी मुंबई महागरपालिकेच्या वतीने शहर भर कुत्रीम फ्लेमिंगो बसवून फ्लेमिगो सिटीचा गवगवा केला. मात्र अस्तित्वात असलेल्या जिवंत फ्लेमिंगो वाचवण्यासाठी नवी मुंबई महानगपालिका कुठलीच पाऊले उचलत नसल्याने फ्लेमिंगोचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेने सेक्टर ५० मधील तलावात नागरिकांना उतरण्यास मज्जाव करावा व शहरातील पाणथळ जागेत फ्लेमिंगो बघण्यासाठी वन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कायम स्वरुपी उपाय योजना कराव्या अशी मागणी पर्यावरण प्रेमी समीर बागवान यांनी केली आहे.