सानपाड्यातील दिव्यांगांचे 'संवेदना' उद्यान उजाळले
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सानपाडा येथील दिव्यांगांच्या 'संवेदना' उदयानातील विद्युत दिव्यांची मोडतोड झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून उदयानात विद्युत दिवे बंद पडले होते. त्यामुळे उद्यानात सायंकाळी अंधार पसरलेला असायचा. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी उदयानातील विद्युत दिव्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना शुक्रवार, दिनांक ३ जून २०२२ रोजी पत्र पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेने आंदोलनाचा इशारा देताच महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी उदयानातील नादुरुस्त विद्युत दिव्यांची शनिवार सकाळी तात्काळ पाहणी केली. त्यानंतर उदयानातील बंद असलेले विद्युत दिवे दुरुस्त करण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले.