हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रम उत्साहात संपन्न

नवी मुंबई:- आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेरुळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक सुनील पाटील, अशोक गुरखे, विनोद म्हात्रे, सुरेश शेट्टी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, विकास सोरटे, जगनाथ जगताप, पांडुरंग आमले, राजेश राय, राजू तिकोने, शशी नायर, सुहासिनी नायडू, ज्योती पाटील, राखी बुर्गे, अपर्णा पांढरे, न.मुं.म.पा. उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, बेलापूर विभाग अधिकारी मिताली संचेती, जनसंपर्क  अधिकारी महेंद्र कोंडे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, लहान मुले उपस्थित होते.

 सदर कार्यक्रमात योग विद्या निकेतन, प्रजापती बिल्डर्स, सायली आर्ट झोन, स्वेडी डान्स फिटनेस अकादमी, पाम रोलर स्केटिंग अकादमी यांनी सहभाग नोंदवला. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सदर कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत आमदार मंदाताई म्हात्रे व आयोजकांचे आभार मानले.

यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, हॅप्पी स्ट्रीट सारखे सकाळी होणारे कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 3 वर्षे घेण्यात आले नव्हते. नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे, त्यांचे जीवन तणावमुक्त राहावे याकरिता योगसाधना, झुंबा, सायकलिंग, स्केटिंग, चित्रकला, हस्तकला, आर्ट अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आली. नवी मुंबईतील नागरिकांनीही सदर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला असून पर्यावरण दिनानिमित्त दिंडी, छोटा भीम, मिकी माउस, हनुमान अशा विविध प्रकारच्या वेषभूषा केलेल्या पात्रांनीही सदर कार्यक्रमात रंगत आणली. 12 जून 2022 रोजीही अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे पोलीसांना रेनकोटचे वाटप