वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण
मुंबई-: मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर राज्यशासनाने देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता जुन महीन्यात सर्वच शाळा सुरू होणार आहे. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मागील तीन चार महिन्यापूर्वी कोरोनाची लाट ओसरल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता. तर रुग्ण संख्या घटल्याने शाळा देखील सुरू करण्यात आल्या व जवळपास सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे कोरोना कमी होत असताना सर्व सामान्य सुखावले होते. मात्र आता जुन महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. आणि अशातच मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरणात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या अशीच वाढत गेली तर सरकार लॉकडाऊन लावते का? वाढत्या रुग्ण संख्येत शाळा सुरू ठेवते? आणि शाळा सुरू ठेवल्या तर मुलांना शाळेत कसे पाठवायचे या चिंतेत सध्या पालक वर्ग पडला आहे.