जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुलांनी चित्रांतून साकारल्या हरित संकल्पना

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज 'पंचतत्वाचे संरक्षण – वसुंधरा संवर्धन' विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांतील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या 130 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या मनातील पर्यावरण संकल्पनांना चित्ररूप दिले. शाळांना उन्हाळी सुटी असतांना देखील विदयार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. 

         चित्रकला स्पर्धास्थळी भेट देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.‌ अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनीही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

         स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना अनुक्रमे प्रथम रु.५ हजार, द्वितीय रु.३ हजार आणि तृतीय रु.२ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच यातील निवडक उत्तम चित्रांचे प्रदर्शनही वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित केले जाणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण