खांदा कॉलनी सेक्टर 12 येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण

नवीन पनवेल : खांदा कॉलनी, सेक्टर 12 येथील अंतर्गत रस्ते विविध कामासाठी सिडकोच्या माध्यमातून खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरते पॅचवर्क करून रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. परंतु पावसात ते पॅच निघाल्यामुळे पुन्हा खड्डे पडत असत या समस्येवर निवारण करण्यासाठी गेली काही महिने विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे हे अंतर्गत रस्ते संपूर्ण डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करत होते. सिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले . यावेळी पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, शेकाप खांदा कॉलनी कार्याध्यक्ष योगेश कोठेकर, शेकापचे युवा नेते मंगेश अपराज, स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे

         या कामात अंतर्गत रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरण करून देण्यात येणार आहे अशी माहिती विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली. याप्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या सर्व सोसायटीमधील रहिवासीयांनी प्रीतम दादांनी वेळोवेळी लक्ष घालून आवश्यक तेव्हा पाण्याचे त्यांच्या संस्थेमार्फत मोफत टँकर पाणीपुरवठा, पाणीपुरवठा नियोजना संदर्भात वेळोवेळी लक्ष देणे, परिसरातील आरक्षित गार्डन प्लॉटवर स्वच्छता करून देणे, सोसायट्यांना स्वतःच्या निधीमधून कचऱ्याचे डबे देणे, व इतर कोणत्याही आवश्यक त्या वेळी मदत करणे अशा विविध समाजपयोगी कामासंदर्भात विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे आणि शेकाप नगरसेवकांचे आभार मानले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पांना विरोध करून जनतेची दिशाभूल - एम के मढवी