रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

पनवेल :  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय युवा मोर्चा पनवेल शहर व ग्रामीण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.  
 
          पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिरास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, युवा नेते दिनेश खानावकर, चिन्मय समेळ, गौरव कांडपिळे, मयूर कदम, आकाश भाटी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

झाडे तोडून त्या जागेवरील भूखंड विक्रीचा डाव ?