खारघर महापौर निवासस्थानाचे भूमिपूजन

खारघर :  पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर मध्ये उभारण्यात येणाऱ्या महापौर  निवासस्थानचे भूमिपूजन शुक्रवार ता.3 जून रोजी  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अदिती तटकरे  यांच्या हस्ते होणार आहे.

  महापौर निवासस्थान खारघर सेक्टर 21 येथील निसर्गरम्य वातावरणात भूखंड क्रमांक 151 वर उभारण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर झाला होता. हे आलिशान निवासस्थान 1807  चौरस मीटरच्या भूखंडावर उभारण्यात येणार आहे. महापौर निवासस्थानासमोर प्रशस्त लॉन, बगीचा, निवासस्थानातील अंतर्गत फर्निचर, सजावट आदी साठी पालिका 9 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे समजले. पुढील एक  वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या उद्घाटनचे स्वागत अध्यक्ष महापौर कविता चौतमल, तसेच खासदार सुनील तटकरे , श्रीरंग बारणे, आमदार अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, निरांजन डावखरे, जयंत पाटील, महेंद्र दळवी, रविशेठ पाटील, प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेश बालदी, आयुक्त गणेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदर काम हे विजयालक्ष्मी या एजन्सी ला देण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

व्यसनापासून दूर रहा -  सहायक आयुक्त